चांदूर बाजार परीसरात आपले सहर्ष स्वागत आहे

चांदूर बाजार शहरामध्ये लक्ष्य आयटी सोल्यूशन व जी ग्रुप तर्फे हार्दिक स्वागत

चांदूर बाजार हे अमरावती जिल्हातील तहसील चे ठिकाण असून येथील बाजारसाठी प्रसिद्ध आहे. उत्तरेकडे निसर्ग संपन्न सातपूढा पर्वत रांगा व मध्य प्रदेश ची सीमा , पश्चिमेकडे अचलपूर तालुका, दक्षिणेस अमरावती जिल्हा व पूर्वेस मोर्शी तालुका असून दक्षिण-पश्चिम भातकुली तालुका व पूर्व-दक्षिण तिवसा तालुका आहे. जिल्हा मुख्यालयापासून ३४ किमी असून रस्ते व लोहमार्गाने जोडले गेले आहे.चांदूर बाजार शहर व शिरजगाव बंड गावचा काही भाग मिळून चांदूर बाजार शहर आहे बहुतांश जुनी वस्ती ही नगर परिषद सीमेत असून कॉलनी परिसर शिरजगाव बंड ग्राम पंचायत मध्ये येते. Read More